भाळवणी : भाळवणी ता.खानापूर ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये जोरदार राजकीय घमासान चित्र पाहावयास मिळत असतानाच येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवारच किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या प्रभागातून उभे असलेले दयानंद सूर्यवंशी हे दोन्ही पॅनलच्या मातब्बर उमेदवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रभागाचे लक्ष या वॉर्डाकडे लागले आहे.
भाळवणीचा वॉर्ड क्रमांक पाच हा अत्यंत चुरशीचा झाला आहे.येथून आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या गटातून अन्सार मुल्ला,महाविकास आघाडी प्रणित संजय मोहिते यांच्या गटातून अल्ताफ नदाफ हे उभा आहेत. तर आरिफ मुल्ला व दयानंद सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. अपक्ष उमेदवार असलेले दयानंद सूर्यवंशी हे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांचे बंधू प्रवीण सूर्यवंशी यांनी सुरुवातीला अनिल भाऊ बाबर गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अनिल भाऊ बाबर गटांने उमेदवारी दिलेले अन्सार मुल्ला हे या अगोदरच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते जनतेने त्यांना नाकारले होते त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असे प्रवीण सूर्यवंशी यांच्या गटाचे म्हणणे होते. परंतु अन्सार मुल्ला यांनाच उमेदवारी फायनल झाल्याने प्रवीण सूर्यवंशी यांनी आपले भाऊ दयानंद सूर्यवंशी यांना मैदानात उतरवले.कोणतेही पद नसताना कोरोनाच्या काळामध्ये प्रवीण सूर्यवंशी यांनी अनेकांना मदत केली आहे.त्याचबरोबर प्रवीण सूर्यवंशी यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत.
त्यामुळे दयानंद सूर्यवंशी मातब्बरांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
0 टिप्पण्या