वायफळेत "राजकीय चाणाक्षांच्या चांणक्यनितीचा" राष्ट्रवादीला जोरदार "दे धक्का"!!

''देर है अंधेर नही 'म्हणत भाजपा प्रणित सुखदेव पाटील पॅनलने आज राष्ट्रवादीचा वचपा काढला.

राजेश पाटील/वायफळे :  ता.तासगाव  येथील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती.पण "राजकीय चाणक्य म्हणून राजकीय पटलावर माहिर" असलेल्या भाजपाचे सुखदेव पाटील यांनी हा पराभव खूप हिमतीने पचवला होता.पण आजच्या सरपंच उप-सरपंच  निवडणुकीत राष्ट्रवादी बाजी मारेल ही आशा सुखदेव पाटील यांनी व भाजप गटाने आज फोल ठरवली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत राष्ट्रवादीचे बलाबल असतांना ही राष्ट्रवादीचा एक महिला सदस्य गैरहजर राहिला व भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हादरा दिला.आजच्या निवडीत राष्ट्रवादीच्या पूनम फाळके या गैरहजर राहिल्याने भाजपचे पंकज तानाजी नलवडे हे 7 मतांनी उपसरपंच झाले.भाजप प्रणित सुखदेव पाटील गटाने हे पद खेचून आणले.व राजकीय वस्ताद म्हणून राजकारणात मुरलेले सुखदेव पाटील व गटाने शांतता व संयम बरोबर करेक्ट कार्यक्रम हे समीकरण घडवून आणले अशीच चर्चा आज वायफळेमध्ये यानिमित्ताने रंगली. 

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून रवींद्र पाटील यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सरपंच  संतोष नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड पार पडली. 

वायफळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. सरपंचपदी संतोष नलवडे हे 17 मतांनी विजयी झाले.या निवडणुकीत सुखदेव पाटील यांना आप्तस्वकीयांनीच धोका दिल्याने निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता.पण भाजप प्रणित सुखदेव पाटील यांच्या जिव्हारी लागलेल्या या पराभवाचा वचपा आज भाजपने पुरता काढला. व भाजपाचे पंकज नलवडे हे उपसरपंच पदी विराजमान झाले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे 7 व राष्ट्रवादीच्या बरोबरीत सुटलेल्या एका सदस्य चिट्ठीत मिळवून ही सदस्य संख्या 6  अशी झाली होती.सरपंचासह राष्ट्रवादीकडे 7 सदस्यांचे संख्याबळ झाले होते. दोन्ही गटांकडे समान संख्याबळ असले तरी सरपंचांना एक अधिकचे निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने उपसरपंचही राष्ट्रवादीचाच होईल या आशेची आज मात्र प्रत्यक्षात निराशा झाली. काल दुपारीच राष्ट्रवादीच्या पूनम फाळके या सदस्या आपल्या पतीसह गायब झाल्या. परिणामी राष्ट्रवादीकडे सरपंचांसह 6 सदस्यांचे संख्याबळ उरले. तर भाजपकडे 7 सदस्यांचे संख्याबळ झाले. दरम्यान, फाळके 'नॉट रिचेबल' झाल्याने राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढल्या होत्या. त्या गैरहजर राहिल्यास उपसरपंच राष्ट्रवादीचा होणार नव्हता.

आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपकडून पंकज नलवडे यांनी तर राष्ट्रवादीकडून संपत पाटील यांनी अर्ज भरले. मतदान प्रक्रियेत नलवडे यांना 7 मते मिळाली तर पाटील यांना 6 मते मिळाली. एका मताने पंकज नलवडे हे उपसरपंच झाले.

यावेळी ग्रामसेवक जे. एन. मोहिते, यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्य, दोन्ही गटाचे प्रमुख उपस्थित होते. निवडीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या