ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का दिला आहे.

डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी - 

चाळीसगाव उन्मेष पाटील

पाचोरा - वैशाली सुर्यवंशी

मेहकर - सिद्धार्थ खरात

बाळापूर - नितीन देशमुख

अकोला पूर्व - गोपाल दातकर

वाशिम - सिद्धार्थ देवळे

बडनेरा - सुनील खराटे

रामटेक - विशाल बरबटे

वणी - संजय दरेकर

लोहा - एकनाथ पवार

कळमनुरी डॉ. संतोष टारफे

परभणी डॉ. राहुल पाटील

गंगाखेड - विशाल कदम

सिल्लोड - सुरेश बनकर

कन्नड - उदयसिंह राजपूत

संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी

संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

वैजापूर - दिनेश परदेशी 

नांदगाव - गणेश धात्रक

मालेगाव बाह्य - अद्वय हिरे

निफाड - अनिल कदम

नाशिक मध्ये- वसंत गीते

नाशिक पश्चिम - सुधाकर बडगुजर

पालघर (अज)- जयेंद्र दुबळा 

बोईसर (अज) - डॉ. विश्वास वळवी

भिवंडी ग्रामीण (अज) - महादेव घाटळ 

अंबरनाथ (अजा) - राजेश मानखेडे

डोंबिवली - दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

ओवळा- माजिवडानरेश मणेरा

कोपरी- पाचपाखाडी - केदार दिघे 

ठाणे - राजन विचारे

ऐरोली- एम के मढवी

मागाठाणे - उदेश पाटेकर

विक्रोळी - सुनील राऊत

भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व - अनंत (बाळा) नर

दिंडोशी - सुनील प्रभु

गोरेगाव - समीर देसाई 

अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके

चेंबुर- प्रशांत फातपृर्पेकर

कुर्ला (अजा) - प्रविणा मोरजकर

कलीना -संजय पोतनीस

वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई

माहिम- महेश सावंत

वरळी - आदित्य ठाकरे

कर्जत- नितीन सावंत

उरण - मनोहर भोईर

महाड स्नेहल जगताप

नेवासा - शंकरराव गडाख

गेवराई - बदामराव पंडित

धाराशिव - कैलास पाटील

परांडा - राहुल पाटील

बार्शी - दिलीप सोपल

सोलापूर दक्षिण - अमर रतिकांत पाटील

सांगोले - दिपक आबा साळुंखे

पाटण - हर्षद कदम

दापोली - संजय कदम

गुहागर - भास्कर जाधव

रत्नागिरी - सुरेंद्रनाथ (बाळ) माने

राजापूर - राजन साळवी

कुडाळ - वैभव नाईक

सावंतवाडी - राजन तेली

राधानगरी - के. पी. पाटील

शाहुवाडी - सत्यजीत आबा पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या