लेंगरे येथे होणार ११ व्यक्तींचा व ३ स्वयंसेवी संस्थांचा गौरव : पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांची अधिकृत माहिती
विटा (प्रतिनिधी) : निसर्ग फाऊंडेशन,लेंगरे या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्राप्त नामांकानातून ११ वैयक्तिक व 3 स्वयंसेवी संस्थाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी आज पुरस्कारकर्त्यांची निवड यादी जाहीर केली असून त्यामध्ये संस्था पुरस्कार साठी शुभम आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग कंपनी पुणे (उद्योजक शेखर मते), श्रेयस उद्योग समूह विटा,भारती विद्यापीठाचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान केंद्र,सांगली या संस्थांची निवड करण्यात आली.
वैयक्तिक पुरस्कारामध्ये भाऊसाहेब पांडुरंग कदम (जीवन गौरव) जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर (कला) डॉ. संदीप डाकवे ('तात्या पुस्तक' साहित्य विभाग) डॉ. श्रीनिकेतन काळे (वैद्यकीय) प्रताप मेटकरी (पत्रकारिता) अजित जाधव (सामाजिक) वामनराव घाडगे (शैक्षणिक) दिपक मोरे (कृषि) शैलजा भिंगारदेवे (समाजसेवा) पै. नाथा पवार ( क्रीडा -कुस्ती) विलास पाटील (उद्योग) यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे म्हणाले की ,निसर्ग फाउंडेशन ही ग्रामीण भागातील संस्था सातत्याने लोकसेवेसाठी कार्यरत आहे. संस्थेने ग्रामीण भागात 'रुग्णवाहिका' सुरु करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना 'निसर्ग सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेने प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन वृत्तपत्र, व सोशल मीडिया च्या माध्यमातून केले होते त्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे, सदस्य फिरोज शेख, नवनाथ सगरे यांनी नामांकने निवडण्यात महत्वाचे योगदान दिले. संस्थेच्या वतीने लेंगरे येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात येईल.निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना निवडीचे पत्र पाठवण्यात येईल अशी माहिती संस्थेचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.
0 टिप्पण्या