राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ

विटा: सांगली जिल्हा भाजपा सचिव आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक पंकज डबडे व नुकत्याच शहर मंडल अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या अर्चना दबडे यांनी आज अचानकपणे आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनीही राजीनामा दिल्यामुळे खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

भाजपा जिल्हा सचिव पंकज दबडे यांनी खानापूर तालुक्यासह विटा शहरात भाजपाची मोट बांधली होती त्यासाठी त्यांनी नवनवीन कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे काम केले होते. यामुळे पंकज डबडे यांच्याकडे राजकीय मोठी ताकद निर्माण झाली होती. तसेच नुकत्याच विटा शहर मंडलाध्यक्षपदी त्यांच्या पत्नी अर्चना डबडे यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. परंतु अचानक काही घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात व विटा शहराच्या राजकारणात घडल्या. त्याचवेळी पंकज डबडे नाराज झालेत की काय अशी चर्चा विटा शहरात सुरू होती. कारण पंकज डबळे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भारतीय जनता पक्षाला शहरासह तालुक्यात मोठी ऊर्जा निर्माण करून दिली होती. त्यामुळे ते नाराज झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही अद्याप त्यांनी राजीनामा का दिला याचे कारण अस्पष्ट असले तरी नुकत्याच झालेल्या काही राजकीय घडामोडी कारणीभूत असू शकतात असे यातून दिसून येत आहे तसेच त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह याबाबत विचार विनिमय करूनच हा निर्णय घेतला असावा अशी ही शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळेच आज पंकज डबडे यांनी आपला भाजप जिल्हा सचिव पदासह त्यांच्या पत्नी व विटा शहर मंडलाध्यक्ष अर्चना डबडे यांच्याही पदाचा राजीनामा दिला. 

त्यांच्यासोबत असणारे सहकारी संदीप ठोंबरे यांनीही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 

या राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे येत्या दोन दिवसात पंकज दबळे हे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं असलं तरी राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याच खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे युवानेते पंकज दबडे नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या