पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा डंपरने चिरडून दुर्दैवी मृत्यू

सांगली, २४ : सांगली शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाणाऱ्या एका विवाहित महिलेचा भरधाव डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. पतीच्या डोळ्यांदेखत हा भीषण अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पूनम गोविंद नलवडे (वय २५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचे पती गोविंद नलवडे किरकोळ जखमी झाले आहेत. विश्रामबाग उड्डाणपुलावर सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
कवलापूर येथील नलवडे दाम्पत्य दीड वर्षांपूर्वीच विवाहबद्ध झाले होते. गोविंद आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत असत. गोविंद हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात होते. आज सकाळी ते उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेने पूनम यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गोविंद किरकोळ जखमी झाले.
या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे शहरात वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याच े निरीक्षक सूरज बिजली आण ि त्यांच े पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळ े नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या