महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने जाहीर केलेल्या आपल्या पहिल्याच यादीमध्ये स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांचे नाव असल्याने उद्या गुरुवारी सुहास बाबर यांनी एकदम साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी सुहास बाबर म्हणाले की, खानापूर - आटपाडी - विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधं- भगिनी, कार्यकर्ते व हितचिंतकांना मी विनम्र आवाहन करतो की, आपणा सर्वांचे दैवत, टेंभु योजनेचे जनक, स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखातुन अद्याप आपण कोणीच सावरलो नाही. त्यांच्या स्मृती जागवणे आणि त्यांच्या आठवणीत राहणे याच मानसिकतेत आपण सर्वजण आहोत. स्वर्गीय भाऊ आपल्यात नसताना विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी आपण सर्वजण सामोरे जात आहोत, यावेळी निश्चित त्यांची उणीव भासत आहे. त्यामुळे उद्या दिनांक २४ रोजी मी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या व आपणा सर्वांच्या आशीर्वादाने साधेपणाने गुरुपुष्यामृत या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपले आशीर्वाद, पाठबळ, सदिच्छा व सहकार्य कायम रहावे हीच प्रार्थना....!
0 टिप्पण्या