विटा (महादेव धनवडे) : तुतारी वाजणार की मशाल पेटणार हा खानापूर मतदार संघात गेले काही दिवस मोठा सस्पेन्स होता तो आता इतिहास जमा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी या चिन्हाचा एबी फॉर्म ॲड.वैभव दादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार जाहीर झाल्यानंतर तीन दिवसानंतर विरोधात वैभव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी AB फॉर्म दिला गेला. ४ दिवस नाट्यमय पद्धतीने मतदार संघात चाललेला गदारोळ AB फॉर्म मिळाल्यानंतर शमला.
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सदाशिवराव पाटील यांना उमेदवारी दिल्याचे वृत्त समोर येताच मतदासंघांत एकच गदारोळ झाला होता. वैभव पाटील हे गेली काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत होते. त्यामुळे पाटील गटातील कार्यकर्त्यानमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्ते भाऊ किव्हा दादा कोणीही चालेल, परंतु मतदार संघात यंदा बदल हवाच अश्या प्रतिक्रिया देताना दिसत होते... तर दुसरीकडे वैभव पाटील हे जयंतराव पाटील माझ्यावर विश्वास ठेऊन मलाच उमेदवारी देतील असे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगत होते. तो विश्वास सार्थ ठरवत आज राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना AB फॉर्म देण्यात आला. पक्षाने वैभव दादांवर जो विश्वास ठेवला तो विजय मिळउनच सार्थ ठरवणार अशी
प्रतिक्रिया देताना कार्यकर्ते दिसत आहेत.
गेले काही दिवस आणि आजचा दिवस खानापूर मतदार संघ वेगवेगळ्या चर्चेने आणि बातम्यांनी ढवळून निघाला होता. सुरुवातीला या मतदारसंघातील उमेदवारी ॲड. सदाशिवराव पाटील यांना मिळणार की राजेंद्र आण्णा यांना मिळणार की वैभव दादा पाटील यांना मिळणार याचा खूप मोठा सस्पेन्स होता. तर थोड्या वेळापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघाचा कोरा एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांच्याकडे सुपूर्द केला होता. परंतु आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी ॲड वैभव दादा पाटील यांना फायनल झाल्याने संजय विभुते यांना थांबण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
मतदारसंघात वैभव पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
उद्या सोमवारी सकाळी ऍड वैभव दादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' चा गाजर मतदार संघात ऐकावयास मिळणार आहे.
0 टिप्पण्या