वैभव पाटील यांना अद्याप तिकीट नाही?


खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी पार्टीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु यामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील यांना तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न मतदारांतून विचारला जात आहे.

Sharad Pawar NCP Vidhan Sabha Election 2024 Candidates Second List: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दुसरी यादी जाहीर केली. तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीने आज परांडा येथे डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव घोषित केले आहे. या मतदारसंघात उमेदवार दिल्यानंतर आता मविआमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयंत पाटील म्हणाले की, याबाबत आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि वाद सोडविण्याचा प्रयत्न करू.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची दुसरी यादी

एरंडोल – सतीश अण्णा पाटील

गंगापूर – सतीश चव्हाण

शहापूर – पांडुरंग बरोरा

भूम-परांडा – राहुल मोटे

बीड – संदीप क्षीरसागर

आर्वी – मयुरा काळे

बागलान – दीपिका चव्हाण

येवला – माणिकराव शिंदे

सिन्नर – उदय सांगळे

दिंडोरी – सुनीताताई चारोसकर

नाशिक पूर्व – गणेश गिते

उल्हासनगर – ओमी कलानी

जुन्नर – सत्यशील शेरकर

पिंपरी – सुलक्षणा शिलवंत

खडकवासला – सचिन दोडके

पर्वती – अश्विनीताई कदम

अकोले – अमित भांगरे

अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर

माळशिरस – उत्तम जानकर

फलटण – दीपक चव्हाण

चंदगड – नंदिनीताई कुपेकर

इचलकरंजी – मदन कारंडे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या