विटा एमडी ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड जाळ्यात; मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक

विट्याजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई ‘कनेक्शन’ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले. संशयित जितेंद्र शरद परमार (वय ४१, रा. नागडोंगरी, ता. अलिबाग, सध्या रा. ताहिर बेकरीच्यावर माहिम १६ मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय ५३, रा. उस्मानिया मशिदजवळ, पाठणवाडी, फिल्डरवाडा, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय ३४, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) या तिघांना अटक करण्यात आली.

विटा येथील कार्वे एमआयडीसीत स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे 30 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले होते. या कारवाईत पोलिसांनी विट्यातील बलराज कातारी याच्या सह तीन जणांना अटक केली होती. या तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता या एमडी ड्रग्स प्रकरणात आणखीन तीन आरोपींचा समावेश असून वाळवा तालुक्यातील सैनेगावच्या आरोपी सरदार पाटील यांनी ड्रग्स कसे बनवायचे याची माहिती अन्य आरोपींना दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. 

याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले यामध्ये जे आम्ली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे 30 कोटी पर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागाने घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे. त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही कसून सखोल चौकशी केली यामागे आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सखोल तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे, नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कोणी हिं्मत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णतः काळजी घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या