विटा तालुका नगर वाचनालय वर्धापन निमित्त 'गुणवंत विद्यार्थी सत्कार'
विटा : विटा तालुका नगर वाचनालयाच्या १५५ व्या वर्धापन दिन निमित्ताने इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा विटा तालुका नगर वाचनालयात सभागृहात आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करताना ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले की, विटा तालुका नगर वाचनालयाच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत खानापूर तालुक्यातील विविध शाळातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज रोजी संपन्न होत आहे वाचनालयाच्या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रम सातत्याने करत आहोत नुकताच जाहीर झालेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या निकालामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व यश संपादन केले आहे त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार आज आमदार सुहास बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करत आहे.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुहास बाबर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावरती पोहोचावे प्रतिकूल परिस्थिती वर मात करत आपण मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची गुणवत्ता असते आपल्या आयुष्यामध्ये आई-वडिलांना गुरुजनांना नेहमी आदरस्थानी ठेवून आपल्या क्षेत्रांमध्ये आपण काम केल्यास नक्कीच यश मिळते मोठ्यांचा आदर करणे एक सुजाण नागरिक आपल्या माध्यमातून निर्माण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
विटा नगर वाचनालय गेली 155 वर्ष ही वाचन चळवळ टिकवून आहे या वाचनालयाच्या माध्यमातून हजारो उपक्रम आजपर्यंत घेण्यात आले आहेत वाचनालयाच्या माध्यमातून मी कित्येक वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना ऊर्जा लाभते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे. असे प्रभावी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेठ च. ग. शहा विद्यामंदिर लेंगरे, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक, पारे हायस्कूल, रेवणसिद्ध हायस्कूल रेणावी, भूड सिद्धनाथ हायस्कूल भूड, न्यू इंग्लिश स्कूल वाळूज नानासाहेब शामरावजी विद्यालय देविखिंडी न्यू इंग्लिश स्कूल वासुंबे, सौ. विजयमाला पतंगराव कदम विद्यालय विटा, विटा हायस्कूल विटा मॉडर्न एज्युकेशन सोसायटी महात्मा गांधी विद्यामंदिर विटा इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला आदर्श माध्यमिक सीबीएससी स्टेट बोर्ड आदर्श पब्लिक स्कूल वत्सलाबाई रामचंद्र दिवटे जुनिअर कॉलेज आदर्श उच्च माध्यमिक विभाग इत्यादी अशा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच बाल वाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला.
कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, ॲड.बाबासाहेब मुळीक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. संदीप मुळीक, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर, आनंदराव पाटील, प्रा. अंकुश निकम, रेवनाथ सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर, निसर्ग फाऊंडेशन सचिव नानासाहेब मंडलिक, सरपंच वैभव जानकर, ग्रंथपाल विक्रम चोथे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या