प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल
देशभरात सुवर्णनगरी म्हणून ओळख असणाऱ्या विटा शहरात सकारात्मक पत्रकारिता करण्याचा एक आदर्श आणि स्वतंत्र ओळख निर्माण करत गेल्या 18 वर्षांपासून आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे एक जिगरबाज, धडाडीचे, उमदे युवा पत्रकार म्हणजे दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप दत्तात्रय मेटकरी यांचा आज 11 जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त...
कायमस्वरूपी दुष्काळी खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज, ध्येयवादी, कष्टाळू आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे. सत्य व वास्तव आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच गोरगरीब आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते अविरतपणे योगदान देत आहेत. दैनिक जनराज्य, जनप्रवास, लोकमत, सकाळ आणि पुन्हा दैनिक जनप्रवास अशी गेल्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपली एक स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केले आहे. पत्रकारिता हा श्वास असलेले एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख जनमाणंसात आहे.
पत्रकारिता व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा समाजाचं प्रतिबिंब म्हणून कशी करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असणारा एक सच्चा पत्रकार, युवा संघटक आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणजे प्रताप मेटकरी.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविण्याचे काम अविरतपणे करत आहेत. आपल्या मनमिळावू, निस्वार्थी आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे अल्पावधीतच प्रताप मेटकरी यांची प्रतिमा ही खर्या अर्थाने एक सकारात्मक आणि संयमी पत्रकार म्हणून समाजामध्ये बनली आहे. प्रचंड मोठया जनसंपर्काच्या बळावर राज्यभरात मित्रपरिवार मैत्रीच्या धाग्याने जोडला आहे. सकारात्मक पत्रकारिता करण्याचा एक आदर्शच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी निर्माण केला आहे.
एखादे काम हाती घेतल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या नेतृत्व गुणांची तसेच आजवरच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरेसाहेब यांनी प्रताप मेटकरी यांना सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. पत्रकार संघटनेच्या आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संघटन आणि नेतृत्व कौशल्याची छाप पाडत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरासह खानापूर तालुक्यातील पत्रकारांना विमा पॉलिसीचे कवच, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, कोरोनायोद्धयांना सन्मानपत्र प्रदान यासारख्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अविरतपणे जपली आहे.
प्रताप मेटकरी यांच्या आजवरच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सन 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय विभागाच्यावतीने "जिल्हा युवा पुुुरस्कारा"ने, सन 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या "राजमाता जिजाऊ स्वावलंबन पत्रकार पुुुरस्काराने, सन 2015 मध्ये समर्थन फाऊंडेशन, मुुंबई विद्यापीठाचा संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्यावतीने "मानवी हक्क वार्ता पुुरस्कार", सन 2017 मध्ये ऑल इंडिया जर्नालिस्ट सोशल फाउंडेशनच्या "युवा पत्रकार पुुरस्कार", सन 2012 मध्ये सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने "युवा पत्रकार पुरस्कार", सन 2015 मध्ये सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने "उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुुुरस्कार", सन 2015 आणि 2016 मध्ये दैनिक सकाळच्या "उत्कृष्ट बातमीदार पुरस्कारा"ने तसेच सन 2020 मध्ये सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने "उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुुुरस्कार" तर सन 2020 मध्ये खानापूर येथील वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने "राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार, लेंगरे येथील निसर्ग फाऊंडेशनच्यावतीने "राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुुुरस्कार" अशा मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
एक जिगरबाज, ध्येयवादी, कष्टाळू, प्रामाणिक, अभ्यासू, चाणाक्ष, सामाजिक भान जपणारा एक हरहुन्नरी पत्रकार आणि एक उत्कृष्ट युवा संघटक असे विविध पैलू त्यांच्याकडे आहेत. जबाबदारी, कर्तव्य, चारित्र्य, उच्चशिक्षण, सन्मान, नेतृत्व, आदर हे निर्माण करण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकता असावी लागते आणि तरच ते यशाचे परिमाण ठरते. जे त्यांच्याकडे लाखपटीने आहे. इतिहास साक्ष ठेवून वर्तमानाचे वास्तव स्विकारून भविष्याचा वेध घेण्याची ऊर्जा पत्रकार प्रताप मेटकरी यांना मिळो, याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...!
0 टिप्पण्या