तासगाव (किरण देवकुळे) : मणेराजूरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची क्रेटा चारचाकी कार पेटविण्यात आली तर, घराचे आतील छतही पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकाराने तासगाव तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार पूर्व वैमन्यास्यातून झाला की राजकीय वादातून याचा तपास तासगाव पोलीस करीत आहेत. या आकस्मित घटनेची तक्रार तासगाव पोलीसात दाखल झाली आहे .
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते व तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामचंद्र (खंडू) पवार यांचे राजमाने वस्ती, रोडवर घर आहे. त्यांचे नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे त्या बांधकामा शेजारीच शेडमध्ये रविवारी दुपारी लावलेली हुंडाई कंपनीची क्रेटा चारचाकी कार अज्ञातांनी रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान ज्वालाग्राही स्प्रे मारुन पेटविल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. याच ठिकाणी नवीन घराचे बांधकामाचे आतील सिलिंगही पेटल्याचे दिसत आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. याची तक्रार रामचंद्र पवार यांनी तासगाव पोलीसात केली आहे. या घटनेला राजकीय की, अन्य कोणता? संबध याबाबत तासगाव पोलीस तपास करीत आहेत .
0 टिप्पण्या