लेंगरे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

 
शेठ च. ग. शहा विद्यामंदिर व निसर्ग फाउंडेशन वतीने सत्कार सोहळा : प्रा. संजय ठिगळे यांचे 'करिअर विशेष' मार्गदर्शन

विटा : लेंगरे येथील इयत्ता 10 वी व 12 वी मधील शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पहिले पाच क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये व जीवनप्रबोधिनी महाविद्यालयाच्या कार्यवाह सौ. सोनियावहिनी बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेठ च. ग. शहा विद्यामंदिर व निसर्ग फाउंडेशन वतीने संपन्न झाला.

कार्यक्रमात सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक डी आर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यामध्ये इयत्ता 10 वी मधील कु. मोरे आदिती प्रवीण,चि. शिंदे वेदांत,कु.बोबडे सानिका संपत, कु. उथळे धनश्री नाना,चि. खंडागळे ओजस संतोष 

इयत्ता 12 वी मधील कु. सिद्धी दशरथ भारते, कु.स्नेहल माणिक पाटील, कु.कोमल धनाजी कांडेसर,कु. गौरी हणमंत डोंबे, कु.वैष्णवी सुरेश भारते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी करिअरच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत स्वतःतील कर्तृत्व सिद्ध करत जागतिक स्तरावरती नावलौकिक करणे महत्त्वपूर्ण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावेत यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम घेतले जातात निसर्ग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुणे मनोगतात सोनिया वहिनी बाबर म्हणाल्या की निसर्ग फाउंडेशन ने आयोजित केलेला विद्यार्थी सत्कार सोहळा हा विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारा सोहळा आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे करिअर निवडून त्यामध्ये अव्वल स्थान मिळवावे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा प्रशासनात उच्च पदावर पोहोचावा यासाठी शाळा पातळीवरती होणारे सत्कार नेहमीच प्रेरणादायी ठरतात विद्यार्थ्यांना उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा निसर्ग फाउंडेशन ने केलेले उपक्रम अतिशय महत्त्वकांक्षा आहे व समाजामध्ये आदर्शवत आहे.

अध्यक्ष मनोगत बोलताना जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित केलेला हा सोहळा महत्वपूर्ण आहेत निसर्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेने असंख्य उपक्रमासोबत देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आयोजित केलेला सत्कार सोहळा विद्यार्थ्यांच्या वाटचालीस प्रेरणादायी ठरेल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, जीवन प्रबोधिनी महाविद्यालय विटा कार्यवाह सोनियावहिनी बाबर, गुरुवर्य सदाशिव मोरे सर, मा. सभापती मनिषाताई बागल, मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख, माजी चेअरमन सुनिलदादा पाटील जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.संजय ठिगळे, सोसायटी संचालक पांडुरंग शिंदे, उद्योजक सईफ देसाई, सौ.सुवर्णा ठिगळे, अजित कांडेसर, मुख्याध्यापक डी.आर. जाधव, संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, अभि गायगवळे, सचिन जाधव सर अन्य उपस्थित होते

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. आर. जाधव यांनी केले, आभार जंगम सर यांनी मानले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या